निमिषाचे कवी आम्ही , निमिषाचे बुद्ध ।
मग उरे तगमग, जाणविता शुद्ध ।
लौकिकाच्या कोळशात अलैकिक हिरा ।
चकाकतो तेवढाच .. बाकीचा ढिगारा ।
लोक म्हणे तुम्ही कसे धरिला हा पंथ ।
कवी काजव्याचा दिवा . . . सुर्य तिथे संत ।
काजव्याचे क्षणिकत्व किती लपेटावे ?
सुर्य व्हावे ... आता सारे अस्तित्व पेटावे !!
3 comments:
mast, kavita atishay aavadali.
धन्यवाद , नंदन.
सुर्य व्हावे ... आता सारे अस्तित्व पेटावे !......... क्या बात है..!!
Post a Comment