Saturday, April 24, 2021

पुस्तक

 

पुस्तक कागदापासून ..कागद झाडापासून ...

म्हणजे .. पुस्तकाचा मूळ पुरुष झाड आहे !

तोच डी एन ए आहे पुस्तकाचा
म्हणून पुस्तकं जगतात वर्षानुवर्ष
असंख्य पांथस्थांना शब्दांची सावली देत
आणि सुसह्य करतात जगणे !
प्रत्येकाच्या पदरात टाकतात काही ना काही
फळ , फूल किंवा पालवी

पुस्तकं हुं की चूं करत नाहीत
माथेफिरू आक्रमकांनी जाळली तरी
कारण, जेव्हा एक पुस्तक जळत असतं
नवी पुस्तकं अंकुरत असतात ....
त्याच मातीतून !

---- प्रसन्न शेंबेकर

No comments: