Thursday, November 23, 2006



हलतात फक्त ही पाने
वारयाची चाहुल नाही
ह्या पाचोळयावर कोठे
काळाचे पाउल नाही

ही दुपार संथपणाने
काळोख लपेटत आहे
हा दिवस मला जाताना
दाराशी भेटत आहे।


हे दु:ख मला आवडते
शिशिराच्या पानगळीचे
मी उदासवाणे मौन
पांघरतो सांजधुळीचे
----

4 comments:

Anonymous said...

कवीवर्य, मानाच्या मुज-याचा स्वीकार व्हावा! फ़ारच सुरेख! चित्र पण मस्तच :)

जयश्री

Anonymous said...

मस्त!!!

परागकण said...

व्वा ! निव्वळ शब्दचित्र !

Shardul said...

तुमच्या सगळ्याच कविता क्लास अपार्ट आहेत..
ही खूप म्हणजे खूपच आवडली.
या सोबतच आवडलेली - पूर्णत्व.