
पाकळी पाकळी मी. . .
जपणार आता किती ?
तुझ्या स्पर्शांची ओढ मला
तुझ्या स्पर्शांची वाटे भीती !
वाटते की हा गंधकोष माझा . . लुटशील का रे तू ?
भ्रमर होऊन माझ्याच मिठीत . . मिटशील का रे तू ?
तुझ्या मिटण्याची ओढ मला . . .
तुझ्या लुटण्याची वाटॆ भीती
वाटते की मला वेचून घेशील. . . ऐन पहाटेस तू
दवाचे मोतीही टिपून घेशील . . राजहंस आहेस तू
भय रात्रीचे नाही मला. .
पहाटेचीच वाटे भीती
स्पर्शताच तुझ्या तेजस हातांनी , उमलून येईन मी
तुझ्यासाठी रात्र सोसली काट्या्त . .तुझीच होईन मी
फूल होण्याची ओढ मला . . .
कळी नसण्याची वाटे भीती !
पाकळी पाकळी मी . . . . . . . . . . .