
मी जसा भेटतो : गझल
मी जसा भेटतो तसा आहे
आतबाहेर आरसा आहे
होतसे राख जो जळे त्याची
काय आयुष्य कोळसा आहे ?
मी पिढीजात सोसतो दु:खे
वेदनेचाच वारसा आहे
हा तुझा दोष, माणसा, आहे
काय माझ्यात पाहिले तेव्हा
(हा तुझा प्रश्नही कसा आहे?)
कविता म्हणजे काही नि:शब्दातले शब्दात आणण्याचे planchet.