Saturday, August 25, 2007


पंढरीची वाट
चालती पाउले
धन्य धन्य बोले
पायधूळ

हजारो मुखांनी
गर्जे पुंडलिक
देवालाही सुख
साह्ववेना

उभा कटेवरी
ठेवूनीया हात
व्याकूळ साक्षात
पांडुरंग

1 comment:

जयश्री said...

वा....अगदी विठ्ठलमय केलंस. चित्रंही सुरेखच!
पण तुला वाटत नाही की फ़ार वाट बघायला लावतोस तू...?