Wednesday, May 21, 2008



पाकळी पाकळी मी. . .
जपणार आता किती ?
तुझ्या स्पर्शांची ओढ मला
तुझ्या स्पर्शांची वाटे भीती !

वाटते की हा गंधकोष माझा . . लुटशील का रे तू ?
भ्रमर हो‌ऊन माझ्याच मिठीत . . मिटशील का रे तू ?
तुझ्या मिटण्याची ओढ मला . . .
तुझ्या लुटण्याची वाटॆ भीती


वाटते की मला वेचून घेशील. . . ऐन पहाटेस तू
दवाचे मोतीही टिपून घेशील . . राजहंस आहेस तू
भय रात्रीचे नाही मला. .
पहाटेचीच वाटे भीती

स्पर्शताच तुझ्या तेजस हातांनी , उमलून ये‌ईन मी
तुझ्यासाठी रात्र सोसली काट्या्त . .तुझीच हो‌ईन मी
फूल होण्याची ओढ मला . . .
कळी नसण्याची वाटे भीती !

पाकळी पाकळी मी . . . . . . . . . . .

8 comments:

जयश्री said...

व्वा व्वा...... एकदम रोमॅटिक रे.....!!
खूप दिवसांनी तुझी नवी कोरी कविता..... आणि ती ही इतकी रोमॅंटिक.... मजा आ गया...:)

Prasanna Shembekar said...

धन्यवाद जयश्री !!

D shivani said...

dada mastach..........

atishay utkrushta virodhabhas.....

khupach masta

Anonymous said...

खुपच सुंदर कविता...आधी पण मी वाचल्या आहेत तुमच्या कविता...आज लगेच अभिप्राय देतेय..मज़ा आ गया...

दीपिका जोशी 'संध्या'

Tushar Joshi said...

फूल होण्याची ओढ मला . . .
कळी नसण्याची वाटे भीती !

वा वा रिषू मजा आला यार. किती दिवसांनी शब्दात आलास रे. उपासमारीने जीव जायची पाळी आली होती.

शैली आवडली. यमकावर परत येण्याची तुझी नेहमीची त-हा या कवितेत एक नवा साज लेऊन वाचायला मिळाली.

~ तुषार

Unknown said...

तुझ्या मिटण्याची ओढ मला . . .
तुझ्या लुटण्याची वाटॆ भीती

wah...... kya baat hai.........
aavadali.......

Anonymous said...

agavar kaata aala reeeeee
ekdam zakassssss

Unknown said...

sarvanna Shandyavaad