
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
अंगणात अजुन बहर कालच्या फुलांचा
अजुन तेच चंद्रप्रहर, त्याच चांदराती
उजळतात अजुन उरी लक्ष लक्ष ज्योती
अजुन कधी स्मरणपथी वादळ ते भेटे
अन क्षणात तनमनात वडवानल पेटे
आठवतो क्षण क्षण ह्या धुंद मीलनाचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
पण आता राहिला न स्पर्श तो सुखाचा
वठला तो वृक्ष पान पान गळुन गेले
वणव्यातच सर्व रान रान जळुन गेले
उरल्या त्या आठवणी मुग्ध बहरण्याच्या
अन दवात भिजत भिजत हळुच उमलण्याच्या
आसपास होई भास त्याच पावलांचा
दरवळतो अजुन गंध पारिजातकाचा
3 comments:
सुरेख !! खूप दिवसांनी तुझी छान कविता वाचायला मिळाली....आज का दिन बन गया !!
Mast re ..... ek no....
THANKS Jayu & Prasad
Post a Comment