नदी जशी आटत जाते
नदी जशी आटत जाते
उघडे पडत जातात घाट
कुत्र्याचे मरतुकडे
पिल्लू
कोरड्या पात्रात फिरे
मोकाट
टिचलेल्या बांगड्या
तळाशी
गुळगुळीत गोटे शेवाळलेले
एखाद दुसरे चिल्लर नाणे
कापड विटके .. विटाळलेले
नदी जशी आटत जाते
झाडांच्या सावल्या
हेलकावत नाहीत
दिगंतराची पाखरे पुन्हा
विसाव्याला येत नाहीत
नदी जशी आटत जाते
डोह होत जातात नग्न
वस्त्रावाचून जसा भासे
शालीनतेचा देह भग्न
---- प्रसन्न शेंबेकर
No comments:
Post a Comment