Friday, January 12, 2007

आता माणसे घडयाळात बघून हसतात, बोलतात
घडयाळाच्या दोन काटयांच्या कोनातच भेटतात माणसे
खरे तर माणसे भेटतच नाहीत
भेटतात त्यांची घडयाळेच

एवढे असूनही
काळ
आजही येत नाही घडयाळ बघून
देवाशी त्याचे इमान …अजुनही कायम आहे!

3 comments:

जयश्री said...

अप्रतिम.....! अगदी खरंय....! प्रसन्न.... तुझ्या कविता अगदी मनापासून पटतात रे! तुझी ती प्रश्नचिन्हाची कविता पण अशीच पटते.

जयश्री

Kshipra said...

खूप दिवस झाले नवीन कविता वाचायला नाही मिळाली.

Prasanna Shembekar said...

जयश्री व क्षिप्रा

प्रतिसादासाठी मन:पुर्वक धन्यवाद !
प्रसन्न