Saturday, February 16, 2008


पावसाची पावलं कधी अलगद उमटतात काचेवर
कधी उन्हाची दुपार लवंडलेली सावलीच्या पारावर
कधी शिशिरात पानगळीची धुरकट संध्याकाळ
वसंत फुटून फुलताना कधी गंधमोहोर वाऱयावर

कधी काहीच कुठेच नसल्य़ाची भावहीन शुन्यता अऩ
नेमकी माणसे वाटेत भेटुन हातात हात घेत बोलणारी
सर्वव्यापकतेची क्षणात दिपवून जाणारी अंतर्जाण
तोच ..प्रेतेयात्रा रस्त्यावरून अचानक फुले मागे उधळत जाणारी

काय आहे हे? कळत नाही.. क्षणोक्षणी बदलणारे काहीसे ?
सावल्यांच्या मायाजाळातून जसे हलत रहावेत कवडसे

जगणे इतके अतर्क्य, अगम्य .. अमर्याद.. अनुभवांचे अंतराळ
की कविता लिहिताना ही माझी लेखणीही ब्रह्म होते
शब्द उतरतात थेट कुणा अज्ञात सम्राटाच्या पालखीतून
मी मात्र भोई .. पायांजवळची माझी सही नम्र असते.





4 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख फोटॊ व कविता ही

विनायक पंडित said...

प्रसन्न! तुमच्या कविता,त्याबरोबरची चित्रं,तुम्ही तुमच्या ब्लॉगचं केलेलं डिझाईन सर्वच अगदी अप्रतिम आहे!
आपण आता मित्र झालो आहोत.
नाटकाच्या आमंत्रणासाठी आभार.

आपला
विनायक पंडित
vinayak-pandit.blogspot.com

जयश्री said...

जगणे इतके अतर्क्य, अगम्य .. अमर्याद.. अनुभवांचे अंतराळ
की कविता लिहिताना ही माझी लेखणीही ब्रह्म होते
शब्द उतरतात थेट कुणा अज्ञात सम्राटाच्या पालखीतून
मी मात्र भोई .. पायांजवळची माझी सही नम्र असते.

........ क्या बात है कवीराज.....!! एकदम जबरी!

Unknown said...

kyaa baat hai..........
amazing..........