Monday, July 15, 2013

"तोच"

टेबलावर त्याचे मोठे मनगटी घड्याळ
बेपर्वाईने काढून फेकलेले शूज कोपऱ्यात
त्याचे स्लॅमबूक, महागडं पेन आणि ड्रॉवरच्या आतलं परफ्यूम
तो मोठा झाल्याची साक्ष देत आहेत...
शोकेसवरचा त्याचा बालपणीचा फोटो
कोपऱ्यातलं टेडी बिअर आणि काही खेळणी जुनी सांगताहेत
त्याच्या आत एक लहान मूल आहे.
मला दोघांनाही सांभाळायचंय
कारण त्याच्या डेस्कवरचा बाबांचा फोटॊ
तोच आहे अजूनही... तसाच.....

प्रसन्न शेंबेकर 

2 comments:

Anonymous said...

आता आपला ब्लॉग जोडा 'मराठी ब्लॉग लिस्ट' ह्या मराठी ब्लोग्सच्या डिरेक्टरीवर तेही अगदी कमी वेळात
लिंक आहे- http://marathibloglist.blogspot.in/

Rupali Thombare said...

chan