Saturday, March 08, 2014

      स्त्री

स्त्री ह्या शब्दातच
आहे जोडाक्षर
विश्व आणि घर
जोडणारे

स्त्री ह्या शब्दातच
आहे ना वेलांटी
देई अनुभुती
सौंदर्याची

स्त्री ह्या शब्दामध्ये
दिसेनासे दु:ख
राहतसे मूक
तिच्या ओठी

1 comment:

अपर्णा हरताळकर शेंबेकर said...

अतिशय मार्मिक आणि आशयघन कविता!