Wednesday, November 22, 2006


ऐकतो मी हाक माझी , गिरी-दरीतुन परतणारी
मोजतो वाळूतली चिन्हे पदांची उमटणारी

ऐकतो कधी तारकांचे गूज , नीरव मध्यरात्री
ढवळतो प्रतिबींब माझे, कधी नदीच्या संथ पात्री

कोरतो वारयातले सारे शहारे काळजावर
सोडुनी देतो सुगंधी श्वासपक्षी पावसावर



लहरतो, कधी बहरतो, कधी पानझडीचा पळस होतो
कधी विरागी सांजरंगी , मंदिराचा कळस होतो

शोधतो माझीच रूपे , मी सभवती, आसमंती
तेवढयासाठीच माझी जन्म-जन्मांची भ्रमंती
------

5 comments:

Anonymous said...

फारच सुंदर कविता आहे.
कोरतो वारयातले सारे शहारे काळजावर
क्या बात है.

Sonal said...

तुमच्या कवितांना समर्पक फोटोज कुठे मिळाले? की फोटो पाहून कविता सुचली? सिंप्ली ग्रेट!! खुप छान लिहिता. मला कविता लिहिणं जमत नाही. आणि मी तसा प्रयत्न करतही नाही. ते माझं क्षेत्र नोहे!!

परागकण said...

कधी विरागी सांजरंगी , मंदिराचा कळस होतो >>>

क्या बात है! जियो !

Prashant S. Thakur said...

अप्रतिम...

चित्राचा आणि शब्दांचा सुरेख मेळ..

हि चित्र कुठून मिळाली सांगाल का?

सुंदर आहे...

Prasanna Shembekar said...

प्रशांत, सोनल
धन्यवाद
ही चित्रं मला नेटवरच मिळाली. बरीच शोढाशोध केल्यावर.

परागकण, ऍनॉनिमस (?) प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
तुमचा
प्रसन्न